Sat, Mar 28, 2020 18:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरेगाव भीमा प्रकरणातील ३४८, मराठा आंदोलनातील ४६० गुन्हे घेतले मागे

कोरेगाव भीमा प्रकरणातील ३४८, मराठा आंदोलनातील ४६० गुन्हे घेतले मागे

Last Updated: Feb 27 2020 4:55PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

कोरेगाव-भीमा प्रकरणातील ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तसेच मराठा आंदोलनातील ४६० गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तसेच शेतकरी आंदोलनातील गुन्हेही लवकरच मागे घेण्यात येतील, अशी माहिती राज्‍याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. 

कोरेगाव-भीमा प्रकरणातील ६४९ पैकी ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तसेच मराठा आंदोलनातील ५४८ पैकी ४६० गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. त्‍याचबरोबर उर्वरित गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया अजून सुरू असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मात्र, सार्वजनिक मालमत्तेवर आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांमधील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असेही देशमुख यांनी स्‍पष्‍ट केले आहे. 

याशिवाय नाणार आंदोलनातील 3 गुन्हे मागे घेतले असून शेतकरी आंदोलनातील गुन्हे देखील लवकरच मागे घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.