Fri, Nov 27, 2020 22:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशातील कोरोना रुग्णसंख्या ६ लाखांवर; २४ तासांत ४३४ जणांचा मृत्यू

देशातील कोरोना रुग्णसंख्या ६ लाखांवर; २४ तासांत ४३४ जणांचा मृत्यू

Last Updated: Jul 02 2020 9:57AM

File Photoनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशातील कोरोना रुग्णसंख्येने ६ लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या २४ तासांत देशात ४३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नवीन १९,१४८ रुग्ण आढळून आले. यामुळे रुग्णांचा आकडा ६ लाख ४ हजार ६४१ वर पोहोचला आहे.

वाचा : कोरोना टास्क फोर्सच्या प्रमुखांनाच कोरोना

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या कोरोनाचे २ लाख २६ हजार ९४७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ३ लाख ५९ हजार ८६० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत १७ हजार ८३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जगातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ८ लाखांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ५ लाख १८ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५९ लाखांहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

वाचा : कोरोना संकटात मुंबई महापालिका कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला स्वस्त!

अमेरिकेपाठोपाठ ब्राझिलमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. ब्राझिलमध्ये आतापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा ६० हजारांवर पोहोचला आहे.