Fri, Apr 23, 2021 13:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुरुवार ठरला घातवार; विविध अपघातांत ३८ ठार

गुरुवार ठरला घातवार; विविध अपघातांत ३८ ठार

Last Updated: Feb 20 2020 2:50PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

आज गुरुवारचा दिवस घातवार ठरला आहे. महाराष्ट्राबरोबर देशातील अनेक भागांत अपघातांची मालिका सुरु आहे. मध्यरात्रीपासून ते गुरुवार दिवसभरात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात सुमारे ३८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

वाचा : तामिळनाडूत भीषण अपघात, २० जणांचा मृत्यू 

तामि‍ळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यात केरळ राज्य परिवहनची बस आणि लॉरीच्या धडकेत २० जणांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी अविनाशी कस्बा येथे घडली. मृतांमध्ये १४ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे.

वाचा : कमल हसन यांच्या चित्रपटाच्या सेटवर क्रेन कोसळली; तिघांचा मृत्यू, १० जखमी

तर दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांच्या 'इंडियन २' या तमिळ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान क्रेन कोसळल्याने मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून १० जखमी झाले आहेत. चेन्नईजवळ बुधवारी रात्री चित्रपटाचा सेट उभारला जात असताना ही घटना घडली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

वाचा : चंद्रपूर : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; अपघातात ६ जण जागीच ठार

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील केसलाघाट येथे ट्रक आणि स्कॉर्पिओ गाडी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ६ जण जागीच ठार झाले आहेत. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमधील सर्वजण चंद्रपूरमधील आहेत. ते गोंदिया येथून देशदर्शनाहून परतत असताना हा भीषण अपघात झाला. केसलाघाट गावात मध्यरात्री उशिरा हा अपघात झाला. 

वाचा : पुणे : ताम्हिणी घाटातील अपघातात ३ ठार 

पुणे - माणगाव रस्‍त्‍यावरील ताम्हिणी घाटात आज गुरूवारी पहाटेच्‍या सुमारास कारच्या झालेल्‍या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सांगली जिल्ह्यात पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येलूर फाटा (ता. वाळवा) येथे ट्रॅव्हल्सला आयशर टेम्पोने धडक दिल्याने टेम्पो चालकाचा मृत्यू झाला.

जम्मूमधील सांबा जिल्ह्यातही आज भीषण अपघात झाला. जम्मू- पठाणकोट महामार्गावर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिली. यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. अमृतसर येथून लग्नाचा कार्यक्रम आटोपून हे सर्वजण जम्मू येथील आपल्या घरी परतत असताना हा अपघात झाला. कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ट्रकच्या खाली घुसली.