Wed, Apr 01, 2020 23:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिद्धिविनायकाच्या चरणी ३५ किलो सोने (video)

सिद्धिविनायकाच्या चरणी ३५ किलो सोने (video)

Last Updated: Jan 21 2020 2:04AM
मुंबई : प्रतिनिधी

लाखो मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या चरणी एका भक्‍ताने तब्बल 35 किलो सोने दान केले आहे. 28 जानेवारीला माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने 15 जानेवारीपासून पाच दिवस शेंदूर लेपनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते.  ते सोमवारी  उघडण्यात आले. मंदिर बंदच्या काळात  नवस पूर्ण झालेल्या एका भाविकाने विघ्नहर्त्याच्या चरणी 35 किलो सोने दान केले.  या सोन्याची किंमत 14 कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते.

गणपती बाप्पाच्या चरणी सोने चढवणार्‍या या भक्‍ताची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. या सोन्याच्या दानातून मंदिराचा गाभारा, घुमट, दरवाजा यासह इतर गोष्टींना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहेत. त्यानंतर रीतसर पूजा आणि विधी करून बाप्पाला आरसा दाखवण्यात आला.