Tue, Aug 04, 2020 13:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात आणखी ३३९५ जणांची कोरोनावर मात

राज्यात आणखी ३३९५ जणांची कोरोनावर मात

Last Updated: Jul 04 2020 9:58PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्यात आज (दि. ४) ७ हजार ७४ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता २ लाख ६४ अशी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्यमंत्री पुढे म्हणाले, आज नवीन ३ हजार ३९५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १ लाख ८ हजार ८२ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८३ हजार २९५ ॲक्टिव्ह रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.०२ टक्के झाले आहे.