Tue, Sep 22, 2020 10:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण डोंबिवलीत २४ तासात ३३६ कोरोना रुग्ण

कल्याण डोंबिवलीत २४ तासात ३३६ कोरोना रुग्ण

Last Updated: Jul 14 2020 7:19PM
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा 

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ३३६ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहे. यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यत १३ हजार ५७६ वर रुग्णांची संख्या पोहचली असून त्यापैकी ६ हजार ९३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर सध्याच्या स्थितीत ६ हजार ४३३ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे.  तर  आतापर्यत २०७ जणांचा मृत्यू झाला आहे.

धारावीच्या धर्तीवर घरोघरी जाऊन तपासणी सुरू...    

कोरोनाच्या प्रादुर्भावावर प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेने  प्रयत्न सुरू केले असून महापालिका क्षेत्रात आढळून येणाऱ्या कोरोनाबाधीत रुग्णांच्या परिसरातील सर्वेक्षण करून हाय रिस्क कॉन्टॅक्टची टेस्ट करून त्यांस आढळून येणाऱ्या लक्षणानुसार रुग्णालयात दाखल केले जाते अथवा क्वारनटाईन केले जाते. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करण्यासाठी जनकल्याण समितीचे कार्यकर्ते व कर्मचारी महापालिका क्षेत्रात घरोघरी जावून सर्वेक्षण काम, नागरीकांचे स्क्रिनिंग व पल्स ऑक्सिमीटरद्वारे ऑक्सिजन तपासण्याचे काम करीत आहे. या सर्वेक्षणात आढळणाऱ्या तापाच्या रुग्णांची महापालिकेतर्फे अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. ज्यामुळे टेस्टचे निदान लवकर होऊन पुढची उपचार पद्धती ठरविणे महापालिकेस सोयीचे होणार असल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, महापालिका क्षेत्रातील जनतेला मदत करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका करीत असलेल्या सर्वेक्षणाच्या कामात मदत करू इच्छिणाऱ्या  नागरीकांनी, एन. जी. ओनी, इतर सेवाभावी संस्थानी महापालिकेच्या आरोग्य खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

 "