Tue, Aug 04, 2020 14:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात नवे 3 हजार 296 बाधित रुग्ण बरे

राज्यात नवे 3 हजार 296 बाधित रुग्ण बरे

Last Updated: Jul 07 2020 7:54PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्यात आज ५ हजार १३४ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता २ लाख १७ हजार १२१ अशी झाली आहे. आज नवीन ३ हजार २९६ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १ लाख १८ हजार ५५८ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८९ हजार २९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख  ६१ हजार ३११ नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ नमुने पॉझिटिव्ह (१८.६९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३१ हजार ९८५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४६३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज २२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २२४ मृत्यू हे मुंबई मनपा-६४, ठाणे-७,ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-२, कल्याण-डोंबिवली मनपा-१३, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-११, पालघर-२, वसई-विरार मनपा-८, पनवेल मनपा-९, नाशिक-४, नाशिक मनपा-९, अहमदनगर-१, धुळे-१, धुळे मनपा-१, जळगाव-५, जळगाव मनपा-३, पुणे-९, पुणे मनपा-२७, पिंपरी-चिंचवड मनपा-१, सोलापूर-३, सोलापूर मनपा-७, सातारा-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-४, जालना-२, लातूर-२, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, यवतमाळ-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे तसेच इतर राज्य १ अशी नोंद आहे.