Sat, Sep 19, 2020 08:21



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोना टेस्ट निगेटीव्ह असल्यास मुंबईकरांना 3 दिवस क्वारंन्टाईन 

कोरोना टेस्ट निगेटीव्ह असल्यास मुंबईकरांना 3 दिवस क्वारंन्टाईन 

Last Updated: Aug 12 2020 12:44AM




मुंबई/सिंधुदुर्ग ः पुढारी वृत्तसेवा

मुंबईहून गावी जाणार्‍या चाकरमान्यांसाठी 12 ऑगस्टपर्यंत पोहोचणार्‍या चाकरमान्यांना 10 दिवसांचे क्वारंन्टाईन तर कोरोना टेस्ट करुन जाणार्‍या चाकरमान्यांना 3 दिवस क्वारंन्टाईन आणि 48 तास आधी जिल्ह्यात पोहोचणे आवश्यक अशी नियमावली सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांनी जाहिर केली आहे. याबरोबरच गणेशोत्सवात गणेश भजने व आरत्या घरच्याघरीच करण्याची परवानगी दिली आहे. तर गणेशाचे आगमन व विसर्जन मिरवणूकही काढता येणार नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात येण्यासाठी एस.टीने प्रवास  करणार्‍यांसाठी वेगळ्या ई-पासची गरज भासणार नाही. इतर खासगी वाहनाने प्रवास करणार्‍यांना ई-पास सक्तीचा असणार आहे. सदर पा covid19.mahapolice.in 
या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. दिनांक 12 ऑगस्ट पर्यंत गणेशोत्सवासाठी येणार्‍या नागरिकांना 10 दिवस गृह अलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यासाठी नागरिकांना कोणत्याही कोविड - 19 च्या तपासणीची आवश्यकता नाही. दिनांक 12 नंतर जे नागरिक जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत त्यांना  किमान 48 तास आधी कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह 

असने गरजेचे आहे. तसेच या व्यक्तींन 3 दिवस घराबाहेर पडू नये, स्थानिक आरोग्य विभागाने त्यांना कोणतीही लक्षणे नसल्याची खात्री करावी. जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या नागरिकांची नाक्यावरच तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने पुरेशा प्रमाणात पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर, रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट किट तपासणी नाक्यावर उपलब्ध करुन द्यावे. आजाराची लक्षण आसणार्‍या व्यक्ती, दुर्धर आजार असणार्‍या व्यक्ती यांची रॅपीड न्टीजेन टेस्ट करण्यात येईल.  

सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश दर्शनासाठी गर्दी होणार नाही. तसेच प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भावीक, शारिरीक अंतराचे, स्वच्छतेचे नियम त्यात मास्क, सॅनिटायझर वापरणे पाळतात याची खात्री मंडळाचे अध्यक्ष यांनी करावी. मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाचे तसेच थर्मल स्क्रिनींगची व्यवस्था करण्यात यावी. श्री गणेशाचे दर्शन सुविधा ऑनलाईन, केबल, वेबसाईट, फेसबूक इत्यादी द्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडळास भेट देणार्‍या व्यक्तींची नोद ठेवावी. जेणेकरून बाधीत रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोपे होईल.

उत्सव कालावधीत गणेश मंडळा बाहेर हार, नारळ, मिठाई दुकाने लावण्यात येऊ नयेत.  विसर्जनावेळी पारंपारिक पद्धतीने विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. 

विशेष रेल्वेला फुलस्टॉप

कोकणात गणपतीसाठी जाणार्‍या चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने राज्य शासनाच्या विनंतीनुसार स्पेशल ट्रेन चालविण्याची योजना आखली खरी परंतु राज्याच्या गृह विभागाने सुरक्षा पुरवण्यास असमर्थता दर्शवल्याने ही सेवा सुरू होण्याअगोदरच बंद झाली आहे. 11 ऑगस्टपासूून चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार होत्या. मात्र यातील एकही फेरी आता सुटणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

गणपतीची आरती, भजन घरच्या घरीच

एकमेकांच्या घरी गणपती दर्शनाला जाता येणार नाही. जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केलेल्या या सूचनांनुसार दरवर्षीप्रमाणे नातेवाईक, शेजारी-पाजारी किंवा इतर गावातील ओळखीच्या लोकांकडे, मित्रमंडळींकडे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाण्याला निर्बंध आहेत. कमीत कमी दिवसात गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या असून भटजीऐवजी तंत्रज्ञानाचा वापर करून पूजा करण्याचे सुचविण्यात आले आहे. येनकेन प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना जनतेने सहकार्य करण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्‍त होत आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश आगमन व विसर्जन मिरवणुकांवर बंदी





 







"