Thu, Jul 02, 2020 18:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 295 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

295 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

Last Updated: Apr 16 2020 12:13AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

राज्यभरात बुधवारी दिवसभरात 36 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 295 रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 52 हजार नमुन्यांपैकी 48 हजार 198 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 2916  जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 69 हजार 738 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 5617  लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बुधवारी राज्यात 9 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईचे 2, पुण्यातील 6 तर अकोला महापालिका क्षेत्रातील 1 रुग्ण आहे.  त्यात  6  पुरुष तर  3  महिला आहेत. झालेल्या 9 मृत्यूपैकी 4 जण हे 60 वर्षांवरील आहेत 3  रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत.  तर दोघेजण 40 वर्षाखालील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 9 जणांपैकी 6 रुग्णांमध्ये (67 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 187 झाली आहे. राज्यात आज एकूण 5394  सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी 20 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.