Thu, Jan 21, 2021 00:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिग बींच्या संपर्कातील २६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 

बिग बींच्या संपर्कातील २६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह 

Last Updated: Jul 13 2020 11:20AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या कोरोनाने बाधित आहेत. अमिताभ बच्चन यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना लागण झाल्यानंतर बच्चन कुटुंबियातील सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अमिताभ यांच्याबरोबर त्यांच्या स्टाफचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. एकूण ५४ स्टाफपैकी २६ जणांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 

अमिताभ यांच्या संपर्कात एकूण ५४ जण होते. काल स्वॅब घेतलेल्या २६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर २८ जण क्वारंटाईन आहेत.

वाचा - अमिताभ म्हणाले, 'कठीण समयी तुमचे खूप आभार' 

अमिताभ बच्चन यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी स्वत:ची वैद्यकीय तपासणी करवून घेतली होती. त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांनी स्वत:चं ट्विटरवरून आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली. दरम्यान, अभिषेक बच्चन यांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. अमिताभ यांच्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.