Mon, Jul 06, 2020 14:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात कोरोनाचे 2,361 नवे रुग्ण; 76 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाचे 2,361 नवे रुग्ण; 76 जणांचा मृत्यू

Last Updated: Jun 01 2020 10:46PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

सोमवारी कोरोनाच्या  2361 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता 70 हजार 013 झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात 30 हजार 108 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 37 हजार 534 रुग्णांवर उपचार सुरू आहे.  

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 71 हजार 573 नमुन्यांपैकी 70 हजार 013 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 67 हजार 552 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 72 हजार 704 खाटा उपलब्ध आहेत. सध्या 36 हजार 189 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सोमवारी 76 कोरोना  बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात मुंबई 52, ठाणे 5, नवी मुंबई 9,  कल्याण डोंबिवली 4 मालेगाव 6, पुणे 9, सोलापूर 2, उस्मानाबाद 1 तर यवतमाळ येथे 1 जणाचा मृत्यू झाला. मृतांपैकी 45 पुरुष तर 31 महिला आहेत.  कोरोनामुळे राज्यात झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या आता 2362 झाली आहे.