Sun, Sep 20, 2020 07:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत १० तासांत २३० मिलिमीटर पाऊस, मिठी नदी धोक्याच्या पातळीवर 

मुंबईत १० तासांत २३० मिलिमीटर पाऊस, मिठी नदी धोक्याच्या पातळीवर 

Last Updated: Aug 04 2020 12:38PM

प्रातिनिधिक फोटोमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुंबईमध्ये गेल्या १० तासांत तब्बल २३० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने शहराच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, सकाळपासून मिठी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून नदीने धोक्याची पातळीही ओलांडली होती. 

सकाळपासूनच मुंबईत पावासाने चांगलाच जोर धरल्याने अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईला सध्या मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिकेने अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घरातून बाहेर पडणे टाळा, असे आवाहन नागरिकांना केले आहे. 

बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज सकाळी पालिका क्षेत्रातील अनेक भागांची पाहणी करुन साचलेले पाणी बाहेर काढण्याच्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी परिस्थितीची माहिती देताना सांगितले की 'धोक्याच्या पातळीवरुन वाहणारी मिठी नदी आता धोक्याच्या पातळीच्या खालून वाहत आहे त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने धोक्याच्या ठिकाणांहून लोकांना बाहेर काढण्याचे कामही बंद केले आहे.'

 "