Mon, Jan 18, 2021 09:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील ७०% रुग्ण एमएमआरमध्ये

राज्यातील ७०% रुग्ण एमएमआरमध्ये

Last Updated: Jul 06 2020 1:22AM
मुंबई : राजेश सावंत

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण तर, देशातील एकूण करोना रुग्णांपैकी 20 टक्के रुग्ण एकट्या मुंबई प्रादेशिक क्षेत्रात आहेत. यात मुंबई महानगरपालिका हद्दीत सर्वाधिक 83 हजार 237 रुग्णांचा समावेश आहे. तर त्या खालोखाल ठाणे महानगरपालिकेत 11 हजार 610 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने 5 जुलैला जाहीर केलेल्या अहवालानुसार देशात कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 73 हजार 165 वर पोचली आहे. यापैकी महाराष्ट्रात 2 लाख 64 कोरोना रुग्ण आहेत. तर मुंबई प्रादेशिक क्षेत्रामध्ये येणार्‍या मुंबई शहरासह ठाणे महापालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, वसई विरार महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, भिवंडी- निजामपूर महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, पालघर व ठाणे ग्रामीण आदी भागात कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 39 हजार 261 इतकी आहे. ही संख्या राज्यातील एकूण कुरणा रुग्णांपैकी 70 टक्के इतकी आहे तर देशात 20 टक्के आहे. रुग्ण वाढीत मुंबई व ठाणे अनुक्रमे पहिल्या व दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका तिसर्‍या क्रमांकावर असून येथे आतापर्यंत 9 हजार 804 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई महानगरपालिका असून येथे 8 हजार 934 रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे ग्रामीण मध्ये 6 हजार 42 रुग्ण आढळून आले आहेत.

वसई-विरार महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत 5 हजार 795 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये 4 हजार 374 रुग्ण सापडले आहेत. भिवंडी-निजामपूर व उल्हासनगर महापालिकेत अनुक्रमे 2 हजार 421 व 2 हजार 648 रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान देशभरात 19 हजार 268 सरांचा करणारे मृत्यू झाला आहे यात 8 हजार 671 महाराष्ट्रात आहेत. तर मुंबई प्रादेशिक क्षेत्रात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6 हजार 269 इतकी आहे. 

यात मुंबई महानगरात 4 हजार 130 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सुमारे सहा पटीने जास्त असताना, राज्यात कोरोनाने मृत्यू होण्याचा दर गुजरातपेक्षा एक टक्क्याने कमी आहे. गुजरातमध्ये मृत्युदर 5.45 टक्के तर राज्यात 4.33 टक्के इतका आहे.