Wed, Sep 23, 2020 01:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात १९८१ तर मुंबईत १३९० कोरोनाचे नवे रुग्ण

ठाण्यात १९८१ तर मुंबईत १३९० कोरोनाचे नवे रुग्ण

Last Updated: Jul 16 2020 1:44AM
मुंबई/ठाणे : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत सोमवारी कोरोनाच्या 1390 नवीन रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 96 हजार 253 वर पोहोचला आहे. 62 जणांचा मृत्यू झाला असून 1197 जण बरे होऊन घरी परतले आहेत. मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी 41 पुरुष व 21 महिला होत्या. 

ठाण्यात कोरोनाचा कहर कमी होत असताना बुधवारी  जिल्ह्यात 1981 नवे रुग्ण सापडले. तब्बल 37 रुग्ण दगावले आहेत. ठाणे जिल्ह्यात  कोरोनाग्रस्तांची संख्या 60 हजार 488 वर पोहचली असून मृतांचा आकडा 1 हजार 724 झाला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 498 नवे रुग्ण सापडले आहेत. ठाण्यात 400, नवी मुंबई 356, उल्हासनगर 226 आणि कल्याण ग्रामीण मध्ये 204 नवे रुग्ण सापडले आहेत. 35 हजार 466 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  

बुधवारी कोरोनाच्या  7 हजार 975 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख  11 हजार 801 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 14 लाख  8 हजार 901 नमुन्यांपैकी 2 लाख 75 हजार 640 नमुने पॉझिटिव्ह (19.56 टक्के) आले आहेत. राज्यात 7 लाख 8 हजार 373 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 

 "