Sat, May 30, 2020 03:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंढरपूर येथून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलचा अपघात, १८ प्रवासी जखमी    

पंढरपूर येथून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलचा अपघात

Last Updated: Nov 09 2019 3:31PM

आंब्‍याच्या झाडाला धडकलेली बसपोलादपूर : प्रतिनिधी

पोलादपूर-वाई-सुरूर राज्य मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. पंढरपूर येथील दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसचा अपघात येथे झाला. या अपघातात चालकासह १८ प्रवासी जखमी झाले. हा अपघात सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास पोलादपूर आड येथे झाला. अपघातातील जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यातील तीन जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी महाडकडे पाठवण्यात आले आहे.

या बाबत मिळालेल्या अधिक माहिती अशी, रत्नागिरी जिल्ह्याच्या तीळ खेड तालुक्यातील खवटी गावातील वारकरी व भाविक पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. ते शनिवारी दर्शन आटोपून परत येत असताना, महाबळेश्वर-पोलादपूर (पोलादपूर-वाई-सुरुर राज्य मार्ग) हद्दीतील आड गावाजवळ आले असता, टेम्पो चालक नितेश बळीराम सावंत (वय. २८) याचा दापोलीचा घाट उतरत असताना गाडीवरील नियंत्रण सुटले, आणि गाडी रस्‍त्‍याच्या विरूध्द दिशेला जात आंब्‍याच्या झाडाला धडकली. या अपघातामध्ये बसमधील चालकासहीत १८ प्रवाशी जखमी झाले. हे सर्व प्रवाशी रत्‍नागिरी जिल्‍ह्यातील खेड तालुक्‍यातील रहिवाशी आहेत. 

या अपघातात सौ. शांता संजय साळवी (वय ४३), सौ. प्रमिला साळवी (वय ४५), प्रणाली साळवी (वय १९), प्रतिभा रघुराम कदम (वय 38), वसंत साळवी (वय ६५), परशुराम कदम (वय ४०), महादेव साळवी (वय ५५), देवजी साळवी (वय ६४), शेखर कदम (वय २६), शिवाजी शेलार (वय ५०), गंगाराम गणपत साळवी (वय ५३), सहदेव  साळवी (वय ७४), सौ.अनिता तुकाराम काजारी (वय ४५), तुकाराम काजारी (वय ५०), सौ.चंद्रभागा कदम (वय ५०), सौ. रोहिणी रवींद्र काजारी  (वय ४०), पार्वती महादेव साळवी (वय ५०), जयवंती गंगाराम साळवी (वय ४८) या प्रवाशांसह चालक नितेश बळीराम साळवी (वय २८) सर्व राहणार दिवाण खवटी खेड रत्नागिरी  हे जखमी झाले आहेत. 

अपघातातील जखमींना तातडीने ग्रामस्थांनी रुग्णवाहिनी सह मिळेल त्या वाहनाने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातीळ  डॉ. शिंदे, डॉ. राहुल निकम, डॉ पाटील (मॅडम) यांनी तातडीने उपचार केले. या मधील ४ जखमींना महाड कडे पाठविण्यात आले. या मध्ये सौ. शांता साळवी, नितेश सावंत, प्रार्वती साळवी यांना पुढील उपचारसाठी महाड ट्रामा केअर मध्ये हलविण्यात आले आहे. 

या अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी घाव घेतली. या अपघाताची फिर्याद शिवाजी पांडुरंग शेलार (वय ५० रा. खवटी जि. रत्नागिरी) यांनी दिली असून बस चालक नितेश सावंत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन खाली खाडे तपास करत आहेत.