Tue, Aug 04, 2020 13:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात १७९७ तर राज्यात ६६०३ नवे रुग्ण

ठाण्यात १७९७ तर राज्यात ६६०३ नवे रुग्ण

Last Updated: Jul 09 2020 1:10AM
मुंबई/ठाणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यात बुधवारी तब्बल 6603 नव्या कोरोना रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंतची रुग्णसंख्या तब्बल सव्वा दोन लाखांच्या घरात पोहोचली आहे. ठाणे जिल्ह्यातही 1797 नवे रुग्ण आढळले आणि रुग्णसंख्या 47 हजार झाली. मुंबईतही 1381 नव्या रुग्णांची भर पडली. 

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून गेल्या चोवीस तासात 1 हजार 797 नवे रुग्ण सापडले तर तब्बल 51 रुग्णांचा बळी गेला आहे. ठाणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 47 हजार 63 वर पोहचली असून मृतांचा आकडा 1 हजार 404 वर पोहचला आहे. दुसरीकडे मीरा-भाईंदरचे आयुक्त डॉ. विजय राठोड हे स्वतःहून क्वारंटाईन झाले आहेत. 

ठाणे शहरात पुन्हा 410 नवे रुग्ण सापडले असून तब्बल 17 रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. ठाण्यातील मृतांचा आकडा 449 वर पोहचला आहे.  रुग्णांची संख्या 11 हजार 705 झाली आहे. कळवा, घोडबंदररोड, माजीवडा, मानपाडा, वर्तकनगर, नौपाडा-कोपरी, लोकमान्यनगर, दिवा परिसरात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कल्याण-डोंबिवलीत रुग्णांच्या संख्येने पुन्हा उसळी घेतली असून 471 नवे रुग्ण सापडले आहेत. नव्याने सात रुग्ण दगावल्याने मृतांची संख्या 158 झाली आहे. कल्याणची रुग्ण संख्येने दहा हजाराचा आकडा पार केला असून  रुग्ण संख्या 10 हजार 351 झाली आहे.

नवी मुंबई 207 नव्या रुग्णांसह 8 हजार 279 रुग्ण संख्या तर आणखी 9 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 269 झाला आहे. ठाणे ग्रामीणमध्ये 107 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तीन रुग्ण दगावले आहेत. रुग्णांची संख्या 2 हजार 592 तर 69 जण दगावले आहेत. दोन हजार 532 रुग्ण असलेल्या भिवंडी महापालिका क्षेत्रात 95 रुग्णांची भर पडली आहे. मृतांमध्ये पुन्हा सहा रुग्णांची भर पडली आहे.

उल्हासनगरमध्ये 172 (एकूण रुग्ण 3260), अंबरनाथ 75 (एकूण 2378), बदलापूर 85 ( एकूण 1158) अशा नव्या रुग्णांची भर पडली आहे. अंबरनाथमध्ये 4, बदलापूर 1 रुग्ण दगावला आहे. मुंबईपेक्षा अधिक रुग्ण सापडू लागल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील आयुक्त डॉ.बिपिन शर्मा यांच्याशी चर्चा केली आहे. 

मुंबईत बुधवारी कोरोना रुग्णांमध्ये 1381 वाढ झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 87 हजार 513 वर पोहोचला आहे. 62 जणांचा मृत्यू झाला असून 1101 जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात 6 लाख 38 हजार  762 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. बुधवारी आणखी 4 हजार 634 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या ही आता 1 लाख 23 हजार 192 झाली आहे.