रायगड जिल्ह्यात 14,681 कोरोनामुक्त

Last Updated: Aug 10 2020 1:15AM
Responsive image


अलिबाग : पुढारी वृत्तसेवा

रायगड जिल्ह्यात उपचारानंतर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातरविवारी पून्हा वाढ दिसून आली,एकुण 14,681 रुग्ण उपचारानंतर संपूर्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान दिवसभरात 427 नव्या कोरोना बाधीत रुग्णांचे निदान झाले आहे.  तर रविवारी 14 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आता पर्यंतच्या जिल्ह्यातील मृतांची संख्या 504 झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

नव्याने निदान झालेल्या 427 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक पनवेल मनपा क्षेत्रात 206, पनवेल ग्रामीण 41, उरण 14, खालापूर 24, कर्जत 05, पेण 30, अलिबाग 54, मुरुड 03, माणगांव 15, रोहा 16,सुधागड 02,  श्रीवर्धन 05, महाड 11 तर पोलादपूर तालुक्यातील एका  रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान पनवेल मनपा क्षेत्रात 08, उरण व पेण मध्ये प्रत्येकी 02,खालापूर व महाड मध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दिवसभरात उपचारानंतर 304 रुग्ण संपूर्ण कोरोनामुक्त झाले, त्यामध्ये पनवेल मनपा हद्दीतील 140, पनवेल ग्रामीण 31, उरण 05, खालापूर 27,  कर्जत 08,  पेण 29, अलिबाग 24, माणगांव 08, रोहा 11,सुधागड 07, श्रीवर्धन 07, महाड 05 तर पोलादपूर तालुक्यांतील दोघांचा समावेश आहे.

आता पर्यंतची जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या 3379 झाली असून त्यामध्ये सर्वाधिक पनवेल मनपा हद्दीत 1555 आहेत.बर्‍या झालेल्या 14,681 रुग्णांमध्ये पनवेल मनपा हद्दीतील 6334 आहेत.जिल्ह्यात आता पर्यंत  504 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.