Sun, Aug 09, 2020 12:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात 1395 तर मुंबईत 1059 नवे रुग्ण

ठाण्यात 1395 तर मुंबईत 1059 नवे रुग्ण

Last Updated: Aug 02 2020 1:33AM
ठाणे/ मुंबई :

कोरोनाचा कहर ठाणे जिल्ह्यात कायम असल्याने प्रशासनाने मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यानंतर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात 1 हजार 395 नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या 87 हजार 351 झाली असून 2 हजार 400 मृत्यू झाले आहेत. मुंबईमध्ये 1 हजार 59 नवे रुग्ण सापडले असून 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एक लाख 15 हजार 346 रुग्ण झाले असून 6 हजार 398 मृत्यू झालेले आहेत. 

60 हॉटस्पॉट असलेल्या कल्याण-डोंबिवलीत नव्याने 303 रुग्ण सापडल्याने रुग्ण संख्या 20 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 20 हजार 270 रुग्णांपैकी 14 हजार 257 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 368 झाली आहे. ठाणे शहरात 226 नवे रुग्ण सापडले असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 19 हजार 295 रुग्ण झालेल्या ठाण्यातील 14 हजार 359 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नवी मुंबईत 342 नवे रुग्ण सापडले असून कोरोनाबाधितांची संख्या 15 हजार 727 वर गेली आहे. 7 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 10 हजार 569 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. तर 4 हजार 733 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.