Fri, Sep 25, 2020 14:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात १२५ कोरोना बाधित ठणठणीत बरे झाले!

राज्यात १२५ कोरोना बाधित ठणठणीत बरे झाले!

Last Updated: Apr 10 2020 9:34AM

आरोग्यमंत्री राजेश टोपेमुंबई : पुढारी ऑनलाईन 

राज्यात काल (ता.१०) कोरोनाच्या २२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १३६४ झाली आहे. कोरोनाबाधित १२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ११४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

वाचा - कोरोनाबाधित क्षेत्रातील ५ कारागृहे लॉकडाऊन; गृह मंत्रालयाचा निर्णय!

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३० हजार ७६६ नमुन्यांपैकी २८ हजार ८६५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर १३६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १२५ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३६ हजार ५३३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३१ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

वाचा - राज्य सरकारचा दणका; प्रधान सचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर

दरम्यान, राज्यात काल २५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात १४, मुंबईतील ९ तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी १ मृत्यू झाला. झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १० महिला आहेत. काल झालेल्या २५ मृत्यूपैकी १२ जण हे ६० वर्षांवरील आहेत, तर मुंबईत निधन झालेल्या एका महिलेचे वय १०१ वर्षे आहे. ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत, तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या २१ रुग्णांमध्ये (८४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. 

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील - 

मुंबई -  ८७६ (मृत्यू ५४)

पुणे  मनपा  -१८१ ( मृत्यू २४)

पुणे (ग्रामीण)  -०६

पिंपरी चिंचवड मनपा-१९

सांगली  - २६    

ठाणे  मनपा  -२६  (मृत्यू ०३)

कल्याण डोंबिवली मनपा-३२  (मृत्यू ०२)

नवी मुंबई मनपा- ३१  (मृत्यू ०२)

मीरा भाईंदर- ०४ (मृत्यू ०१)

वसई विरार मनपा-  ११ (मृत्यू ०२)

पनवेल मनपा-०६

ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण (मृत्यू १)- प्रत्येकी ०३

नागपूर -१९ (मृत्यू ०१)

अहमदनगर मनपा    १६

अहमदनगर ग्रामीण  ०९

उस्मानाबाद, अमरावती मनपा (मृत्यू २), यवतमाळ, रत्नागिरी (मृत्यू २)  प्रत्येकी  ०४

लातूर मनपा -०८

औरंगाबाद मनपा-६ (मृत्यू ०१)

बुलढाणा -११ ( मृत्यू ०१)

सातारा - ०६ (मृत्यू ०१)

अकोला -०९

कोल्हापूर मनपा -०५

मालेगाव- ०५   (मृत्यू ०१)    

उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा व ग्रामीण, जळगाव ग्रामीण व मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, गोंदिया, वाशीम, बीड, सिंधूदूर्ग, जळगाव प्रत्येकी  )

एकूण- १३६७ त्यापैकी १२५ जणांना घरी सोडले तर ९७ जणांचा मृत्यू

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४२६१ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १६ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.  

 "