Mon, Jun 01, 2020 03:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात कोरोना संसर्गाचा धोका वाढला; दिवसात १२ जणांचा मृत्यू 

देशात कोरोना संसर्गाचा धोका वाढला; दिवसात १२ जणांचा मृत्यू 

Last Updated: Apr 02 2020 6:49PM

मुंबईतील वरळी भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने येथील परिसर सील करण्यात आला आहे.नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

देशभरात कोरोना संसर्गाचा धोका वाढत असून आतापर्यंत १ हजार ९६५ जणांना संसर्गाची लागण झाली आहे, तर गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ३२८ नवे रूग्ण आढळले असून १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी देण्यात आली. 

वाचा : आता लढाई सुरू झाली, राज्यांना केंद्राकडून तातडीने ११ हजार कोटी

आतापर्यंत ५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महारोगाईतून जवळपास १५१ रूग्ण पूर्णत: बरे झाले आहेत. निजामुद्दीन मर्कजमध्ये हजेरी लावणाऱ्या ४०० जणांमध्ये कोरोना संसर्ग आढळला आहे. तर, जवळपास १ हजार ८०४ तबलिगींना क्वॉरंटाईन करण्यात आले आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
 
कोरोना विरोधातील संघर्ष अजून सुरू आहे. सर्वांचे सहकार्य त्यामुळे आवश्यक आहे. सर्व धर्मियांनी समाजिक अंतर पाळण्याच्या नियमांचे कडेकोट पालन करावे. राज्य सरकारने लॉकडाऊनच्या नियमांचे कठोर पालन करावे, असे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले. मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत कोरोनामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण परिसर त्यामुळे सील करण्यात आल्याचेही अग्रवाल म्हणाले. 

वाचा : 'व्हीव्हीआयपी' सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण

जिल्हापातळीवर कोरोनाचा सामना करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन 

जमातच्या ४०० सदस्यांमध्ये कोरोना संसर्ग आढळला आहे. जिल्हा पातळीवर कोरोना संकटावर मात करण्याचे आवाहन त्यामुळे पंतप्रधानांकडून करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. १.५ कोटींहून अधिक वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचे (पीपीई) आदेश देण्यात आली आहे. पीपीईचा पुरवठा सुरु झाला आहे. येत्या काही काळात या समस्येवर निश्चित तोडगा काढला जाईल. राज्यांच्या रूग्णसंख्येच्या आधारे पीपीईचा पूरवठा केला जाईल. एक कोटी 'एन-९५' मास्क बनवण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

तबलिगी जमातच्या ९ हजार कार्यकर्त्यांची पटली ओळख 

तबलिगी जमातचे कार्यकर्ते तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास ९ हजार नागरिकांची ओळख पटली आहे. त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. ९ हजार पैकी १ हजार ३०६ जण विदेशी असून उर्वरित भारतीय आहे, अशी माहिती गृ​​ह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी दिली. दिल्लीत जवळपास २ हजार तबलिगी जमातच्या सदस्यांपैकी १ हजार ८०४ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे, तर ३३४ जणांवर रूग्णालयात उपचार सुरु आहे. 

वाचा : कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी माजी सैनिक आता मैदानात!

लॉकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश

लॉकडाऊन दरम्यान अनावश्यकरित्या फिरणाऱ्याविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दोन वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कोरोनासोबत दोन हात करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्याविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. बचाव कार्य अथवा त्याच्याशी निगडीत साहित्याच्या रक्कमेत हेरफार करताना आढळल्यास संबंधितांना तुरूंगात टाकण्याचे आदेश गृ​ह सचिवांकडून सर्व राज्यांना देण्यात आले आहेत. 

कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई

योग्य कारणाशिवाय कर्तव्यावर हजर नसलेल्या अथवा सुटी घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचे करीत खटला चालवण्याचे आदेश गृहसचिवांकडून देण्यात आले आहे. अशा कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त एक वर्षाचा ​कारावासीची शिक्षा होवू शकते. अफवा तसेच चूकीचे संदेश प्रसारित करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करून त्यांना एक वा दोन वर्षाच्या कारवासाची शिक्षा ठोठावली जावू शकते.