अवघ्या सात दिवसांत ११८५ इमारती सीलमुक्त!

Last Updated: Feb 28 2021 2:16AM
Responsive image
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्यामध्ये वाढ झाल्यामुळे 20 फेब्रुवारीला शहर व उपनगरातील तब्बल 1 हजार 305 इमारती सील करण्यात आल्या. इमारतीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्यामुळे या इमारती सील केल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. अवघ्या सहा दिवसात 1185 इमारती सील मुक्त करण्यात आल्या. हा चमत्कार कसा काय झाला? यामागचे गोडबंगाल काही कळेना.

मुंबईत 1 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. 20 फेब्रुवारीला 897 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्यामुळे तब्बल 1 हजार 305 इमारती सील करण्यात आल्याचे पालिकेने जाहीर केले. त्याची यादीही प्रसिद्ध केली. अचानक इमारतीमध्ये वाढलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईकरही भयभीत झाले. मात्र 21 फेब्रुवारीला तब्बल 921 रुग्ण सापडूनही सीलबंद इमारतीची संख्या 1 हजार 17 वर आली. अवघ्या 24 तासात 288 इमारती सील मुक्त झाल्या. इमारती सिल मुक्त झाल्यामुळे रुग्णांना बरे व्हायला अवघे 24 तासच लागले का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.