Tue, Aug 11, 2020 21:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उल्हासनगरमध्ये 108 रुग्णवाहिका चालक, डॉक्टरला दोघांकडून मारहाण 

उल्हासनगरमध्ये 108 रुग्णवाहिका चालक, डॉक्टरला दोघांकडून मारहाण 

Published On: Jul 11 2018 1:37AM | Last Updated: Jul 11 2018 12:36AMउल्हासनगर : वार्ताहर 

एका गरोदर महिलेला उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयातून शिवाजी रुग्णालय, कळवा येथे घेऊन जात असताना 2 तरुणांनी रुग्णवाहिकेचा चालक, डॉक्टरसोबत वाद घालून त्यांचा मारहाण केली. हा प्रकार मध्यवर्ती रुग्णालयाच्या आवारात सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन निखील कटके, अभिषेक बासरे या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांविरोधात अदखल पत्र गुन्हा दाखल करण्यात आला. 

भारत विकास ग्रुप यांच्यातर्फे 108 रुग्णवाहिकेचे चालक विशाल बच्छाव आणि डॉक्टर विनोद जयस्वाल हे कॅम्प नं.4 येथील शासकीय प्रसूतीगृह व दवाखाना येथे रविवारी रात्री कामावर हजर होते. मध्यरात्री अडीजच्या सुमारास रुग्णालयातून चालक विशाल यांना एका 7 महिन्यांच्या गरोदर महिलेला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून छत्रपती शिवाजी रुग्णालय, कळवा येथे घेऊन जायचे आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे विशाल रुग्णवाहिका घेऊन मध्यवर्ती रुग्णालयात गेले. त्यावेळी रुग्ण महिलेसह त्यांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेत बसवण्यात आले. तर, पेशंटला शिवाजी रुग्णालयात वर्ग केल्याबाबतचे पत्र रुग्णवाहिकेतील डॉक्टर विनोद यांना  देण्यात आले. त्यावेळी त्यांनी व चालक विशाल यांनी पेशंटच्या नातेवाईकांना आम्ही तुम्हाला शिवाजी रुग्णालयात सोडू, असे सांगितले. 

त्यावेळी 2 अनोळखी व्यक्‍ती तेथे आले. त्यांनी चालकाला पेशंटला कळवा येथे न सोडता वाडीया किंवा केईएम रुग्णालय न्या, असे सांगत त्यांच्याशी वाद घातला. तसेच दोघांनाही शिवीगाळ,  धक्काबुक्की करत मारहाण केली. विशालच्या तोंडावर, डोक्यावर जबर मारहाण केल्याने त्यांच्या नाकातून रक्त येऊन ते जखमी झाले.