Fri, Sep 18, 2020 22:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत 1066 तर ठाण्यात 1207 कोरोनाचे नवे रूग्ण 

मुंबईत 1066 तर ठाण्यात 1207 कोरोनाचे नवे रूग्ण 

Last Updated: Aug 10 2020 1:29AM
ठाणे : पुढारी वृत्तसेवा 

मुंबईत रविवारी कोरोनाच्या 1066 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा 1 लाख 23 हजार 397 वर पोहोचला आहे. 48 जणांचा मृत्यू झाला असून 1232 जण बरे होऊन घरी परतले आहेत. मृत्यू पावलेल्या  36 जणांना दीर्घकालीन आजार होते. ठाणे जिल्ह्यात  1 हजार 207 रुग्णांची भर पडली असून  29 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 98 हजार 167 तर, मृतांची संख्या आता दोन हजार 747 झाली आहे.  विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्राचा कोरोना रुग्णांचा आकडा हा वाढताच असून यामुळे या क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वाधिक 332 रुग्णांची तर, 8 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 18  हजार 481 तर, मृतांची संख्या 469 वर पोहोचला आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकाक्षेत्रात 297 रुग्णांची तर, 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 22 हजार 452 तर, मृतांची संख्या 440 इतकी झाली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीत 202 बाधितांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या 22 हजार 4 तर, मृतांची संख्या 695 वर गेली आहे. मीरा भाईंदरमध्ये 164 रुग्णांची तर, 1 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 9 हजार 583 तर, मृतांची संख्या 313 इतकी झाली आहे. तर, भिवंडी महापालिका क्षेत्रात 23 बधीतांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 779 वर पोहोचली. उल्हासनगर 23 रुग्णांची तर, 3 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 7 हजार 137 तर, मृतांची संख्या 157 झाली आहे. अंबरनाथमध्ये 66 रुग्णांची तर, 1 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 248 तर, मृतांची संख्या 166 झाली आहे. बदलापूरमध्ये 54रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 3 हजार 67 इतकी झाली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात 46 रुग्णांची तर, 4 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 7 हजार 416 तर, मृतांची संख्या 198 वर गेली आहे.

 "