Wed, Sep 23, 2020 03:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रायगड : रोह्यात कोरोना थैमान सुरूच

रायगड : रोह्यात कोरोना थैमान सुरूच

Last Updated: Jul 05 2020 7:11PM

संग्रहित छायाचित्ररोहे : पुढारी वृत्तसेवा 

रोहा शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा थैमान सुरूच आहे. रोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रूग्ण सापडत असल्याने रोहा शहरासह ग्रामीण भागास चिंतेने ग्रासले आहे. रोहा शहरासह तालुक्यात रविवारी (दि.५) एकाच दिवसात १० कोरोनाबाधित रूग्ण सापडल्याची माहिती रोहा तहसिलदार कविता जाधव यांनी दिली आहे.

मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पाऊस, अनेक भागांत पाणी साचले

रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाय योजना महसुल, नगरपरिषद, ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. परंतु कोरोनाची साखळी न तुटता दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या अकड्यात वाढतच होत आहे.

रोहा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात रविवारी १० कोरोनाबाधित सापडले असुन यात शहरात ६ तर ग्रामीण भागात ४ बाधित सापडले आहेत. या कोरोनाबाधितांमध्ये ६  महिलांचा व ४ पुरूषांचा समावेश आहे. रोहा तालुक्यात आजचे हे १० कोरोनाबाधित सापडल्यानंतर आतापर्यंत कोरोना रूग्णांचा अकडा १७८ झाला आहे. यामध्ये ११८ कोरोना सक्रिय बाधितांचा अकडा आहे. आता पर्यंत रोहा तालुक्यात ५८ व्यक्तीनी कोरोनावर मात केली आहे. तर २ जणांचा कोरोनाने ब‍ळी गेला आहे.

 'दिलबर दिलबर' फेम नोरा फतेहीचा बेली डान्सचा सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ! (video)

रोहा शहरातील कोरोना रूग्णाची संख्या ४० वर गेली असुन यामध्ये कोरोना सक्रियांचा अकडा हा ३४ आहे. आतापर्यंत रोहा शहरातील ५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

'राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय'

आज सापडलेले १० रूग्ण

शिवाजी वसाहात वरसे १ (पुरूष वय ४५), संत गोरोबा नगर १ (महिला वय ५२), ग्रीन पार्क ब्रेंन्डा कॉम्लेक्स वरसे १ (महिला वय ४७), सत्य कौ.ऑ.हौसींग सोसायटी २ (मुलगी वय १७ आणि मुलगा वय १५), माऊली अपार्टमेंट अंगारआळी नागोठणे १ (महिली वय ५५), राठी स्कुल समोर वाघेश्वर १ (महिला वय ४२), मिना अपार्टमेंट रायकर पार्क ३ (पुरूष वय २४, महिला वय २६ आणि पुरूष वय ३२)  

दरम्यान रोहा तालुक्यात गेल्या सात दिवसात २९ जुन ते ५ जुलै पर्यंत १०२ कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. या दरम्यान ३० लोकांनी कोरोनावर मात केली तर दोघांना कोरोना संसर्गमुळे प्राण गमवावे लागले आहे. बरे होण्याचे प्रमाण कमी असल्याचे या अकडेवारी वरून दिसुन येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा अकडा हा झपाटयाने वाढत आहे. स्थानिक पातळीवर प्रशासनाने बाजारपेठा ही बंद केल्या आहेत. नागरीकांनी घरा बाहेर पढु नये, गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा असे आवहान करण्यात येत आहे. रोहा तालुक्यातील कोरोनाबाधित व्यक्तीमध्ये सर्वाधिक सुदर्शन कंपनी कामगार व त्यांचे कुंटुबीये आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना आता कोरोनाचा संसर्ग होत असल्याने रोह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वाढत आहे.

 "