कोरोनासंदर्भात राज्यात १ लाख ६४ हजार गुन्हे दाखल

Last Updated: Jul 11 2020 8:26PM
Responsive image


मुंबई : पुढारी ऑनलाईन 

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ६४ हजार १६० गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ३६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

आणखी वाचा : गणेशोत्सवासाठी गाईडलाईन्स जाहीर; मंडळांना 'एवढ्याच' उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करता येणार!

देशमुख म्हणाले की, अत्यावश्यक सेवेसाठी ५ लाख ८० हजार ७६९ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १० जुलै या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३०८ घटना घडल्या आहेत. या प्रकरणी ८६७ व्यक्तींना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती दिली.

ते पुढे म्हणाले, १०० नंबरवर आतापर्यंत १ लाख ०६ हजार ५११ फोन आले आहेत. राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का आहे, अशा ८०१ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले आहे. तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आतापर्यंत ९० हजार ७३ वाहने जप्त केलेली आहेत.

आणखी वाचा : ड्रॅगनचा निर्लज्जपणा! वंदे भारत रेल्वे सेवेसाठी चिनी कंपनीची निविदा

कोविड १९ च्या संसर्गामुळे ७५ पोलिसांचा मृत्यू

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना ७५ पोलिस कर्मचा-यांचा  मृत्यू झाला आहे. यात मुंबईतील ४३ पोलिस व ३ अधिकारी असे एकूण ४६, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३,  नाशिक शहर १, एटीएस १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ५,  ठाणे ग्रामीण १ पोलिस, १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, रायगड १, जालना एसआरपीएफ १, अमरावती शहर १,  उस्मानाबाद १, नवी मुंबई एसआरपीएफ १ अधिकारी यांचा समावेश आहे. राज्यात १३० पोलिस अधिकारी व १०२७ पोलीस कर्मचा-यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, असेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगीतले.

आणखी वाचा : धारावीत आरएसएसने कोणताही आवाज न करता रात्रंदिवस काम केलं! : नितेश राणे