Tue, May 26, 2020 16:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात कोरोनाचे ८२ नवे रुग्ण, रुग्णांची संख्या ३०२

राज्यात कोरोनाचे ८२ नवे रुग्ण, रुग्णांची संख्या ३०२

Last Updated: Mar 31 2020 8:56PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आज मंगळवारी (दि.३१) राज्यात एकूण ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. या रुग्णांमध्ये ५९, मुंबई १३, पुणे ५, अहमदनगरचे ३ व बुलढाणा येथील २ आहेत. याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली आहे. 

वाचा : राज्यात कोरोना गुणाकार करतोय, काळजी घ्या : मुख्यमंत्री (video)

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील :

मुंबई- १५१

पुणे (शहर व ग्रामीण भाग)- ४८

सांगली-२५

मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा-३६

नागपूर-१६

यवतमाळ-४

अहमदनगर-८

बुलडाणा-३

सातारा, कोल्हापूर  प्रत्येकी-  २

औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी-  १

इतर राज्य - गुजरात १

एकूण ३०२, त्यापैकी ३९ जणांना घरी सोडले तर १० जणांचा मृत्यू

राज्यात आज एकूण ४०६ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६३३१ नमुन्यांपैकी ५७८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३९ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २३ हजार ९१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १४३४ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

वाचा : दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमाला गेलेल्यांना शोधा : आरोग्यमंत्र्यांचे आदेश

राज्यात कोरोना चाचण्यांची सुविधा देशात महाराष्ट्रात सर्वाधिक असून १३ शासकीय आणि ८ खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज ५५०० चाचण्या करू शकतो. राज्यात आतापर्यंत ६३२३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून ५९११ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.

राज्यात १३ शासकीय प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोनाची चाचणी केली जात आहे. त्याद्वारे दररोज २३०० चाचण्या केल्या जाण्याची क्षमता आहे. आता त्यामध्ये अजून ३ शासकीय प्रयोगशाळांना मान्यता देण्यात येणार असून राज्यात शासकीय प्रयोगशाळांची संख्या १६ होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.

वाचा : कोल्हापूर : सीपीआर हादरले; एका कोरोना संशयित तरुणाचा मृत्यू

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही. रेशनचे वाटप होणार आहे. जीवनाश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे, असे सांगितले.

राज्यात कोरोना गुणाकार करतोय. त्यासाठी अनावश्यक गर्दी टाळा, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंगळवारी केले. हे युद्ध आहे आपण ते जिंकणारच, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.