Fri, Sep 18, 2020 20:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'हिंमत असेल तर फडणवीस यांनी लोकसभेची निवडणूक घ्यावी'

'हिंमत असेल तर फडणवीस यांनी लोकसभेची निवडणूक घ्यावी'

Last Updated: Feb 17 2020 1:38PM

नवाब मलिकमुंबई : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना आणि राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुका घेण्याचे आव्हान देणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच हिम्मत असेल तर लोकसभेची निवडणूक घ्यावी, असे प्रतिआव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे. 

भाजपला अजूनही सत्तेचे स्वप्न पडत असल्याने ते रोज ऊठसूट काहीही विधान करत सुटले आहेत. नवी मुंबई येथे भाजप मेळाव्यात विधानसभा निवडणूक घेण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा मलिक यांनी समाचार घेतला.

ते म्हणाले, राज्यात हातून सत्ता गेल्याने भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत. भाजप नेत्यांना सत्तेचा आजार झाला आहे, दिवसभर सत्तेत कसा येऊ याचा विचार करतात. रात्री रोज त्यांना सत्तेची स्वप्न पडतात. यामुळे हा आजार वाढत जाणार. आम्हाला त्यांची काळजी वाटते. त्यांनी चांगल्या डॉक्टरांकडून उपचार घ्यावा, असा सल्लाही मलिक यांनी दिला.

भाजपाच्या काही लोकांना आमच्यात वाद आहेत असे दाखवण्याची सवय झाली आहे. बऱ्याच वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांना आघाडी सरकारमध्ये वाद आहेत हे दाखवण्यात रस आहे, मात्र ते वास्तव नाही. आम्ही आघाडीतील सर्व मंत्री एकजुटीने काम करत असल्याचेही  मलिक यांनी सांगितले.
 

 "