Tue, Aug 04, 2020 13:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'कारागृहात आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करा'

'कारागृहात आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करा'

Last Updated: Jul 02 2020 6:32PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रात कारागृहातील कैद्यांमध्ये कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता कैद्याला कोरोना लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करा. तसेच तुरुंगात अतिरिक्त फौजफाटा तैनात करा, याचबरोबर सुरक्षा उपाययोजनांसाठी आयसीएमआरने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे अंमलजावणी करा. असे निर्देश राज्य सरकार आणि कारागृह प्रशासनाला दिले.

अधिक वाचा :संजय लीला भन्साळी यांची चौकशी होणार!

आर्थर रोड कारागृहासह राज्यातील अन्य कारागृहांमध्येही कैद्यांना करोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर कारागृहातील सगळ्याच कैद्यांची सरसकट कोरोना चाचणीची घेण्यात यावी, तसेच कैद्यांना एन-९५ मास्क, हँड सॅनिटायझर्स आणि साबण यांच्यासह संरक्षणात्मक साधने पुरविण्यात यावीत, अशी मागणी करणारी याचिका पीपल्स युनियन सिव्हिल लिबर्टीज या सामाजिक संस्थेने हायकोर्टात दाखल केली आहे. सदर याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय आज दिला.

याचिकाकर्त्यांनी सुचविल्याप्रमाणे कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शक तत्वे तयार करावी आणि कारागृहे तसेच सुधारगृहामध्ये त्याबाबत अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देशही खंडपीठाने आपल्या निकालातून राज्य सरकार आणि कारागृह प्रशासनाला दिले.

अधिक वाचा : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम

याव्यतिरिक्त कारागृहांसाठी केंद्र, राज्य आणि आयसीएमआरने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे असून त्यात होणार्‍या बदलांचीही अंमलबजावणी या कारागृहात करण्यात यावी असेही आपल्या आदेशात स्पष्ट केले. तसेच राज्यातील २७ जिल्ह्यात ३५ तात्पूरत्या  तत्वावर उभारण्यात आलेली कारागृहे आणि ज्या कारागृहांचा वापर कैद्यांसाठी विलकगीकरण कक्ष अथवा कोरोना  केअर सेंटरसाठी होत आहे. तेथे या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात यावे, अशा ठिकाणी अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा, असेही निर्देश देताना कारागृहांची माहिती कैद्यांच्या नातेवाईकांना द्या. त्यासाठी वेबासाईटवर सादर  करा असेही न्यायालयाने बजावले.

अधिक वाचा : दिल्ली-मुंबई दरम्यान ताशी १६० किमी वेगाने धावणार ट्रेन

न्यायालयाने मागील सुनावणी वेळी कारागृहातील स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) सुनिल रामानंद यांनी अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार राज्यातील १० तुरूंगांतील एकूण १७६९५ कैद्यांच्या स्क्रिनिंग्ज आणि १६८१ स्वॅब चाचण्या घेण्यात आल्या.त्यापैकी २७८९ कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी ११५ कैदी तर ५२ कारागृह कर्मचार्‍यांनी कोरोनावर मात केली. 

केवळ चार जणांचा दुदैवी मृत्यू झाला. या कैद्यांच्या मृत्यूनंतर घेण्यात आलेल्या चाचणीत ते कोरोनाबाधित असल्याचे उघड झाले. तसेच कोरोनाबाधित कैद्यांच्या अलगीकरणासाठी कारागृहात जागाच नसल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले होते.