Tue, Aug 11, 2020 21:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाणार प्रकल्प रत्नागिरीतून रायगड जिल्ह्यात येणार

नाणार प्रकल्प रत्नागिरीतून रायगड जिल्ह्यात येणार

Published On: Jun 20 2019 2:12AM | Last Updated: Jun 20 2019 2:08AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित वादग्रस्त रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार आहे. विधानसभेत बुधवारी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. मोहम्मद आरिफ नसीम खान  यांच्यासह  38 सदस्यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला  त्यांनी लेखी उत्तर दिले आहे.

सौदी अरेबियाची अरमाको, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या सहभागातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात नाणार, सागवे, कात्रादेवी परिसरांत जगातील सर्वात मोठी रिफायनरी म्हणजे खनिज तेल शुद्धीकरणाचा तीन लाख कोटींचा हा भव्य प्रकल्प येऊ घातला होता. ह्या प्रकल्पासाठी 16 हजार एकर जमीन संपादित केली जाणार होती. पण नाणारमधून हटवून ही रिफायनरी आता रायगड जिल्ह्यात येणार आहे. 
रायगडमध्ये प्रकल्प आणण्यास स्थानिकांचा विरोध नाही. 40 गावांमधील ग्रामस्थांचा भूसंपादनाला विरोध नाही, असे मुख्यमंत्र्यांनी उत्तरात म्हटले आहे.