Wed, Jul 15, 2020 23:51होमपेज › Marathwada › महिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या

महिलेकडून शरीरसुखाची मागणी, तरुणाची आत्महत्या

Published On: Oct 15 2018 11:18AM | Last Updated: Oct 15 2018 12:34PMपरभणी : पुढारी ऑनलाईन

एका महिलेकडून वारंवार शरीरसुखाची मागणी होत असल्यामुळे त्या जाचाला कंटाळून एका युवकाने परभणीत आत्महत्या केली. परभणी-वसमत रोडवरील ब्रम्हा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या सचिन मिटकरी याने रविवारी रात्री गळफास घेऊन जीवन संपविले.


सचिनने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून, त्यात एका महिलेच्या नावाचा उल्‍लेख आहे. या महिलेने माझे आयुष्य बरबाद केले आहे. तिने माझ्याकडे सतत शरीरसुखाची मागणी केली. ते करण्यासाठी सतत माझ्यावर दबाव टाकला. तिचे अजून दोन-तीन मुलांसोबत अनैतिक संबंध आहेत. माझ्या आत्महत्येला तिच जबाबदार असून, तिने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. या सर्व त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे, असे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, आरोपी महिलेने पाच दिवसांपूर्वी मृत तरुणावर ग्रामीण पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.