Wed, Jan 22, 2020 02:43होमपेज › Marathwada › उमरगा येथे प्रेमसंबंधातून तरूणाच खून 

उमरगा येथे प्रेमसंबंधातून तरूणाच खून 

Published On: Feb 16 2018 7:43PM | Last Updated: Feb 16 2018 7:42PMउमरगा : प्रतिनिधी

चुलत बहिणीसोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरून चार जणांनी हंटरने केलेल्या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. श्रीमंत राजेंद्र आमाशेट्टे (वय, २२) असे मृत्‍यू  झालेल्‍या तरूणाचे नाव आहे. ही घटना उरगा तालुक्यातील वागदरी शिवारात घडली. या प्रकरणी एकाला अटक केली असून, तिघे फरार आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीमंत वागदरी येथे शालेय सांस्कृतिक कार्यक्रम पहाण्यासाठी श्रीमंतचा चुलत भाऊ सचिन संजय आमाशेट्टे व मित्र वीरभद्र स्वामी यांच्या सोबत गेला होता. सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर श्रीमंत व सचिन दोघे दुचाकीवरुन गावाकडे परत निघाले होते. यावेळी वागदरी-गुगळगाव रस्त्यालगत आधीच दबा धरून बसलेले मारुती उर्फ वाघ शंकर व्हनाळे, चिंटू उर्फ विक्रम मारुती भोसले, अशोक शेषेराव मंमाळे यांनी श्रीमंतची मोटारसायकल आडवली आहिण त्‍याच्या डोक्यात हंटरने जबर मारहाण केली. या मारहाणीत श्रीमंतचा जागीच मृत्यू झाला. 

मारहाणीनंतर चौघेही तेथून पळून गेले. श्रीमंतचा चुलत भाऊ सचिन याने घटनेची माहिती तात्काळ गावात व पोलिसात देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी सचिन आमाशेट्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन यातील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मारुती शंकर व्हनाळे यास पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरीत फरार तिघांचा पोलिस शोध घेत आहेत.