Wed, May 27, 2020 01:52होमपेज › Marathwada › उस्मानाबाद : रस्ता, गटारीच्या कामासाठी झोपा काढो आंदोलन (video)

उस्मानाबाद : रस्ता, गटारीच्या कामासाठी झोपा काढो आंदोलन (video)

Last Updated: Feb 17 2020 2:08PM

उस्मानाबाद : रस्ता व गटारीचे काम होत नसल्यामुळे बेमुदत  झोपा काढो आंदोलन उमरगा (जि.उस्मानाबाद) : पुढारी वृत्तसेवा

शहरातील राष्ट्रीय महामार्ग ते माळी नाल्यापर्यंत रस्ता व गटारीचे काम होत नसल्यामुळे पतंगे रोड समितीच्यावतीने आज बेमुदत  झोपा काढो आंदोलन करण्‍यात आले आहे. अण्णा भाऊ साठे चौकात सोमवारी  सकाळी अकरापासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यासोबतच सदरचे काम डिपी प्लॅनप्रमाणे करण्यात यावे, अशी देखील या आंदोलकांची मागणी आहे. या आंदोलनामुळे  राष्ट्रीय महामार्गा वरून बसवेश्वर विद्यालयाकडे जाणारा मार्ग बंद पडला आहे.  

आंदोलनात समीतीचे अध्यक्ष मनोजकुमार जाधव, सचिव आर. सी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बालाजी पाटील, माजी नगरसेवक दत्ता रोंगे, सुशील दळगडे, सुनिल औरादकर आदींसह या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यात जेष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.