Tue, Sep 22, 2020 06:37होमपेज › Marathwada › गडावर मुलगा म्हणून आलो:  छत्रपती उदयनराजे

गडावर मुलगा म्हणून आलो:  छत्रपती उदयनराजे

Published On: Jun 04 2018 1:05AM | Last Updated: Jun 03 2018 11:24PMबीड: प्रतिनिधी

गोपीनाथराव मुंडे आपल्यासाठी मित्र, तत्त्ववेत्ता   व मार्गदर्शक असल्याचे सांगून ते खर्‍या अर्थाने लोकांमधला ‘लोकराजा’ होते.  आपण या कार्यक्रमाला छत्रपती म्हणून नाही तर  मुलगा म्हणून इथे आलो आहोत. गोपीनाथराव मुंडे यांचे सर्व गुण पंकजा व प्रीतममध्ये दिसतात. मी काल तुमचा होतो, आज पण तुमचा आहे आणि उद्या बदलणार नाही असा विश्‍वास छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये यावेळी दिला.      

छत्रपतींचा सन्मान व्हावा म्हणून गोपीनाथ मुंडेंचे प्रयत्न ः छत्रपती संभाजीराजे भोसले

गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रण लागत नाही, हे आमचं हक्काचं ठिकाण आहे. उदयनराजे आणि संभाजीराजे खूप कमी ठिकाणी एकत्र येत असतात तोच योग आज आलाय.  आठरापगड जाती व समाजघटकाशी नाळ जुळलेल्या नेतृत्वाला व त्यांच्या विचाराला पुढे घेऊन जाण्याचे काम समर्थपणे आमच्या भगिनी पंकजा मुंडे करत आहेत. आपण सदैव त्यांच्या पाठिशी उभे असल्याची ग्वाही छत्रपती  संभाजीराजे भोसले यांनी दिली.