Mon, Jul 06, 2020 18:19होमपेज › Marathwada › बीड : दरोडेखोरांच्या हल्ल्यात गेवराईत महिला ठार

बीड : दरोडेखोरांच्या हल्ल्यात गेवराईत महिला ठार

Published On: Apr 01 2019 10:59AM | Last Updated: Apr 01 2019 10:59AM
बीड : प्रतिनिधी 

बीड जिल्ह्यातील गेवराई येथे दरोडेखोरानी लूटमार करीत एका ६२ वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.

पुष्पाबाई शिवप्रसाद शर्मा असे महिलेचे नाव आहे. गेवराई शहरातील खडकपुरा भागात राहणार्‍या शर्मा यांच्या घरी, सोमवारी (ता.१)पहाटे अज्ञात दरोडेखोरानी लूटमार केली. शर्मा यांच्या घरातील लोकांना मारहाण करीत पाच ते सहा लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला. 

पुष्पाबाई शिवप्रसाद शर्मा यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेत असताना त्यांनी प्रतिकार केला.  दरोडेखोरांनी चार्जरच्या वायरने गळा आवळून त्यांचा खून केला. या घटनेने गेवराई शहर हादरले आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा करून, दरोडेखोरांच्या अटकेसाठी पथके पाठविण्यात आली आहेत.