जळगाव : पुढारी ऑनलाईन
जळगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही भाजपकडून घाणेकर चौकात व्यासपीठ थाटण्यात आले आहे. व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवरून घरकूल घोटाळा प्रकरणी दोषी असलेल्या विद्यमान नगरसेवकांचे फोटो वगळण्यात आले असल्याचे दिसून आले.
भाजपचे व्यासपीठ यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठे करण्यात आले आहे. परंतु, बॅनरवरून काही विद्यमान नगरसेवकांचे फोटो वगळण्यात आले आहेत. यामध्ये भाजप मनपा गटनेते भगत बालाणी, सिंधुताई कोल्हे, कैलास सोनवणे यांचा समावेश आहे. नगरसेवक भगत बालाणी व कैलास सोनवणे यांना नुकतेच घरकुल घोटाळ्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे तर सिंधुताई कोल्हे यांच्यावर वेगळा खटला चालविला जाणार आहे.