Mon, Jul 13, 2020 12:27होमपेज › Marathwada › जालना : भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो उलटला, २० जण जखमी        

जालना : टेम्पो उलटला, २० जण जखमी        

Published On: Dec 19 2018 1:59PM | Last Updated: Dec 19 2018 2:24PM
जालना :प्रतिनिधी 

नवगावहुन पंढरपूर कडे जाणारा भाविकांचा टेम्पो पलटी होऊन २० भाविक जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. १९) सकाळी १० च्या दरम्यान घडली.

अपघात झाल्यानंतर जखमींना ताबडतोब रुग्णवाहिका व खाजगी वाहनातून शहागड, अंबड,गेवराई येथे हलविण्यात आले आहे. भागवत एकादशी निमित्त पैठण व अंबड तालुक्यातील भाविक हे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी टेम्पोत जात होते. शहागड -पैठण रोडववरील जिंनिग जवळ रिक्षाला ओव्हरटेक करत असताना एक चाक रोड च्या खाली गेल्याने टेम्पो पलटी झाला असे प्रत्यक्ष दर्शीने सांगितले.

अपघात झालेल्या टेम्पोत जवळपास ४० ते  ५० जण होते. टेम्पोतील सर्वच प्रवासी जखमी झाले असुन त्यात काही गंभीर  जखमी आहे. जखमींमधील काहींचे हात, पाय फॅक्चर झाले आहेत तर कुणाला डोक्याला मार आहे. 

रामदास तोंडीबा जेधे वय ५० विहमांडवा ता.पैठण, केशरबाई अंकूश डेंगरे वय ६० विहमांडवा ता.पैठण, सुरेखा गोरख जेधे वय ५५ विहमांडवा ता.पैठण, देवूबाई कोंडीबा इंगळे वय ६०, नवगाव ता.पैठण, ज्ञानदेव नामदेव चिमटे वय ५० रामनगर ता.पैठण, लक्ष्मीबाई दत्ता हुके वय ६०रा. दह्याळा ता.अंबड, आसाराम रामजी बारगजे वय ५५ रा.विहमांडवा ता.पैठण, श्रीधर डांगे वय ६०रा दह्याळा ता.अंबड, सोपान ज्ञानदेव सिरसाट वय ५५ रा.रामनगर ता.पैठण, गणेश विष्णू सातोड वय २३ नवगाव ता.पैठण. ही आतापर्यंत कळू शकलेली जखमींची नावे आहेतअजून काही जखमीचे नावे कळू शकले नाही. 

भागवत एकादशी निमित्त पैठण व अंबड तालुक्यातील भाविक हे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी टेम्पोत जात होते. शहागड -पैठण रोडववरील जिंनिग जवळ रिक्षाला ओव्हरटेक करत असताना एक चाक रोड च्या खाली गेल्याने टेम्पो पलटी झाला असे प्रत्यक्ष दर्शीने सांगितले.