Wed, Jul 08, 2020 10:43होमपेज › Marathwada › राष्ट्रवादीतील फूट मोदींच्या पथ्यावर पडण्याची शक्यता

राष्ट्रवादीतील फूट मोदींच्या पथ्यावर पडण्याची शक्यता

Published On: Dec 21 2018 1:25AM | Last Updated: Dec 20 2018 11:11PM
अंबाजोगाई : अ. र. पटेल

येथील नगर परिषदेच्या अध्यक्षा रचना मोदी या काँग्रेसच्या आहेत, तर बहुमत राष्ट्रवादीकडे असल्याने उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे आहेत. परंतु निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट स्वतंत्र होते. आता नगर परिषदेचे उपाध्यक्षपद राजकिशोर मोदी यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या संभाव्य बदलामागे विधानसभा आणि लोकसभेची गणितेही दडली असल्याचे राजकीय जाणकारातून बोलले जात आहे.

अंबाजोगाई शहराच्या राजकारणाचा विचार केला तर मोदी विरुद्ध मुंदडा असाच सतत राजकीय सामना रंगत असतो. भाजपा नेत्यांची सोयीनुसार राजकीय भूमिका असल्याने राजकारणात त्याचा फारसा परिणाम जाणवत नाही. केज विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे मोदी उमेदवार देण्याचा सतत प्रयत्न करत असतात मात्र काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी राज्यस्तरीय पातळीवर होत असल्याने शेवटी आघाडीचा धर्म मोदींना पाळावा लागतो. नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक राष्ट्रवादीचे 16 नगरसेवक निवडून आले होते. एका नगरसेविकेच्या निधनानंतर ही संख्या 15 वर आली. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदावर मुंदडा समर्थक सारंग पुजारी यांची निवड झाली. मात्र काही कालावधी गेल्यानंतर राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व माजी आमदार साठे असे दोन गट पडले उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असंलेल्या नगरसेवकांनी साठे गटात सामील होऊन पहिल्यांदा पुजारी यांच्याकडील असलेले गटनेतेपद काढून घेतले. त्यामुळे उपनगराध्यक्ष हटाव मोहीम लवकरच हाती घेणार असल्याची कुजबूज नगर परिषद परिसरात सुरू झाली आहे.

सनगर परिषदेत गेली पंधरा वीस वर्षांपासून एक हाती कारभार चालवणार्‍या मोदींना गेल्या एक-दीड वर्षात कामकाज करत असताना बरेच अडथळे आले त्यामुळे मोदी संधीची वाट पहात होते.  आता मुंदडा गटाकडून उपाध्यक्ष पद काढून घेतल्यास पुन्हा राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष होईल याची राष्ट्रवादीच्या नेत्यांना शाश्वती नाही. त्यामुळे उपनगराध्यक्ष हटाव मोहीम सुरू करण्याआधी साठे गटाचे नगरसेवक आकड्यांची जुळवाजुळव करत आहेत. मोदी राजकीय खेळी खेळण्यात परिपक्व असल्याने त्यांनी अद्याप आपले मनसुबे उघड केलेले नाहीत.  नगरपरिषदेत भाजपाच्या नगरसेवकांची संख्या सहा असली तरी त्यांनाही उपाध्यक्षपद हवे आहे. काँग्रेस व एका राष्ट्रवादीच्या गटाने मदत करावी अशी त्यांना अपेक्षा आहे मात्र सहा  महिन्यावर आलेल्या  लोकसभेच्या निवडणुका पाहता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना नगर परिषदेमध्ये बहुमत असताना भाजपाला उपाध्यक्षपद देणे परवडणारे नाही.त्यामुळे पापा मोदींनाच उपाध्यक्षपदासाठी पसंती दिली जाईल असे चित्र सध्या दिसत आहे.

ससारंग पुजारी यांच्याऐवजी उपनगराध्यक्षपद पापा मोदींकडे गेले तर मुंदडा गटासाठी हा निर्णय सोयीचा होईल असे बोलले जात आहे.  मोदी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. योगायोगाने संधी आली तर राजकीय निर्णय घेण्यात माहीर असलेले नंदुकिशोर मोदी यांच्या बाजूने भूमिका घेऊ शकतात. हा निर्णय घेतल्याने पक्षांतर्गत विरोधकांना चांगली चपराक बसेल असा अंदाज राजकीय क्षेत्रात बांधला जात आहे.