Wed, Sep 23, 2020 22:00होमपेज › Marathwada › परळीत दुसर्‍या श्रावणी सोमवारी हजारो भाविकांचे वैद्यनाथ दर्शन

परळीत दुसर्‍या श्रावणी सोमवारी हजारो भाविकांचे वैद्यनाथ दर्शन

Published On: Aug 12 2019 7:07PM | Last Updated: Aug 12 2019 7:07PM
परळी वैजनाथ : प्रतिनिधी

बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी आज (दि.१२) दुसर्‍या श्रावणी सोमवारी भाविकांनी  मोठी गर्दी केली. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या त्यामुळे मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने फुलून गेला. दिवसभरात विविध ठिकाणच्या हजारो भाविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. 

श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर परळीत दररोज देशातील विविध ठिकाणचे भाविक दाखल होत आहेत. आज दुसर्‍या श्रावणी सोमवारी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत मोठ्या संख्येने भाविक  आले. काल रविवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या

भाविकांनी केली मेरुप्रदक्षिणा ....

परळीत विविध धार्मिक परंपरा पहावयास मिळतात. यामध्ये परळी व पंचक्रोशीतील भाविक वैद्यनाथ दर्शन झाल्यानंतर मेरुगिरी प्रदक्षिणा करतात. मेरुप्रदक्षिणा करून जगमित्रनागा समाधीदर्शन करण्याची परंपरा येथे आहे. दुसर्‍या श्रावणी सोमवारी  परळी पंचक्रोशीतील विविध गावामधून आलेल्या भाविकांनी मेरुप्रदक्षिणा करून आपली वारी पूर्ण केली.