Thu, Jun 04, 2020 03:16होमपेज › Marathwada › रितेश आणि जेनेलिया कोणाची मुलाखत घेणार?

रितेश आणि जेनेलिया कोणाची मुलाखत घेणार?

Last Updated: Feb 14 2020 3:54PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूडमधील मोस्ट रोमँटिक जोडींपैकी एक असलेल्या रितेश आणि जेनेलिया देशमुख प्रकट मुलाखत घेताना दिसून येणार आहेत. विशेष म्हणजे ही राजकीय मुलाखत असेल. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता यांची  रितेश आणि जेनेलिया मुलाखत घेणार आहेत. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्त नांदेडात‘आनंदाचे डोही’ या कार्यक्रमात ही मुलाखत होईल. 

महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी समारोह समितीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात मैदानावर ही मुलाखत रंगणार आहे.