Fri, Jul 10, 2020 17:51होमपेज › Marathwada › बीड : पिंपरवाडा येथे विवाहितेवर अतिप्रसंग

बीड : पिंपरवाडा येथे विवाहितेवर अतिप्रसंग

Last Updated: Nov 18 2019 1:47AM
किल्लेधारूर : प्रतिनिधी 

नदीवर कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या विवाहित महिलेवर चाकूने धाक दाखवत अतिप्रसंग केल्याचा प्रकार पिंपरवाडा शिवारात शुक्रवारी दुपारी घडला. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून कृष्णा बाबू तिडके याच्या विरोधात धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याप्रकरणी धारूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी (दि.१५ ) दुपारी पिंपरवाडा शिवारात असलेल्या नदीवर विवाहित महिला कपडे धुण्यासाठी जात होती. तिच्या पाठीमागून कृष्णा बाबू तिडके हा तिथे पोचला होता. त्याने महिलेचा हात धरत तोंडावर कपडा दाबला. ओरडू नकोस नाहीतर चाकू तुझ्या पोटात भोकसतो अशी धमकी दिली. तसेच नदी जवळच असलेल्या एका तुरीच्या शेतात ओढत नेत तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर याबद्दल कोणाला सांगू नको असे म्हणूत दमदाटीही केली. 

विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कृष्णा तिडके यांच्या विरोधात धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ए.पी.आय के.एम.पालवे करत आहे .