Sat, Jul 04, 2020 01:00होमपेज › Marathwada › वाशिम : अयोध्येवरून धर्मगुरुंचे शांततेचे आवाहन

वाशिम : अयोध्येवरून धर्मगुरुंचे शांततेचे आवाहन

Last Updated: Nov 06 2019 3:22PM
वाशिम : प्रतिनिधी

अयोध्या येथील विवादित राम मंदिर व बाबरी मस्जिदच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल केव्हाही जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हायअलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

या अनुषंगाने जिल्ह्यात सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वाशिम जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गर्शनात वाशिम जिल्ह्यात प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात जातीय सलोखा राहावा म्हणू उपविभागीय पोलिस कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बनसोड यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व समाजाचे सर्वधर्मीय धर्मगुरू व शांतता समितीचे सभासद यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सर्वोच्च न्यायलयाच्या निकाला सर्वांनी आदर करून ते स्वीकार केला पाहिजे. जो निकाल असेल तो देश हिताचाच असेल. त्यामुळे हा निकाल स्वीकारणे हे भारतीय नागरिकांचे अध्य कर्तव्य आहे. आपण सर्वधर्म समभाव या हेतूने देशात एकता राहावी म्हणुन प्रयत्न करायला हवे. तसेच निकाला दिवशी कोणत्याही प्रकारचा गैरवर्तन कोणीही करू नये असे आवाहन नागरिकांना या बैठीकित सर्व धर्म गुरूंनी केले आहे.