Sun, Dec 08, 2019 09:13होमपेज › Marathwada › हिंगोली : पानकनेरगावात महिलेवर बलात्कार

हिंगोली : पानकनेरगावात महिलेवर बलात्कार

Published On: Oct 08 2018 10:09PM | Last Updated: Oct 08 2018 10:09PMहिंगोली : प्रतिनिधी

शौचास गेलेल्या महिलेवर अत्याचाराची घटना सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे रविवारी (दि.७) दुपारच्या सुमारास घडली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी सेनगाव पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, प्रतिकार करणाऱ्या महिलेवर आरोपीने चाकूने वारही केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पानकनेरगाव येथील तीस वर्षीय महिला आपल्या घराच्या पाठिमागील जागेत शौचास गेली होती. त्यावेळी अर्जुन संतोष देशमुख (२२,रा.पानकनेरगाव) याने तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने या घटनेपूर्वी देखील पीडित महिलेला वेळोवेळी शरीरसुखाची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. रविवारी महिलेला गाठून आरोपीने अत्याचार केला. त्यावेळी महिलेने प्रतिकार केला असता तिच्यावर चाकूहल्ला केला. घटनेप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी अर्जुन देशमुख याच्याविरूद्ध कलम ३७६, ३५४ (अ), ३५४ (ब), ३२४, ३२३, ५०४, ५०६ भादंवी अन्वये सेनगाव ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीने महिला व तिच्या कुटुंबीयांस जिवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले असून, अधिक तपास सेनगाव पोलिस करीत आहेत.