Wed, Aug 12, 2020 21:30होमपेज › Marathwada › जिल्ह्यात दिवसभर पावसाची प्रतीक्षा

जिल्ह्यात दिवसभर पावसाची प्रतीक्षा

Published On: Jun 04 2018 1:05AM | Last Updated: Jun 03 2018 11:28PMबीड : प्रतिनिधी

यंदाचा उन्हाळा अतिशय दाहक असल्याची प्रतिक्रिया सर्व सामान्यांतून चार महिन्यांच्या कालावधीत नेहमीच ऐकावयास आली, मात्र मान्सूनपूर्व पावसाने जिल्हावासियांना मोठा दिलासा दिला आहे. रविवारी सकाळपासूनच बीड शहरात ढग दाटून आले होते. दिवसभरात ढगाळमय वातावरण असल्याने अनेकांना गर्मीपासून दिलासा मिळाला परंतु सांयकाळपर्यंत पावसाने हजेरी लावली नव्हती. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील आकडेवारीनुसार, फे बु्रवारी अखेर ते 31 मते पर्यंत पारा 38 ते 42 च्या मध्येच होता. काही दिवस पारा खाली गेला मात्र त्यानंतर तीव्र तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे यंदाचा उन्हाळा मागच्या उन्हाळ्यापेक्षा दाहक असल्याचा अनुभव नागरिकांना आला. मागच्या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे उकाडा आणखीन वाढला होता. तापलेली जमीन ओली होण्यास कालावधी लागणार असल्याने उकाड्यात भर 
पडली होती.  पाऊस पडेल असेच वातावरण दिवसभर होते.

या अचानक वाढलेल्या उकाड्याचा त्रास वयोवृद्ध नागरिक व नवजात बालकांना मोठ्या प्रमाणात झाला. दरम्यान, मागील काही दिवसांत जिल्ह्यातील काही भागांत  मान्सूनपूर्व पावसाचे जोरदार आगमन झाले अन् शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला. हा पाऊस असाच बरसावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांसह नागरिकांना आहे.   पाऊस चांगला झाला तर बाजारपेेठेत देखील आशादायक वातावरण बनते. त्याचा फायदा व्यावसायिकांना होतो. त्यामुळे व्यावसायिक देखील दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.