होमपेज › Marathwada › बीडमध्ये कुंटणखान्यावर छापा, एकाला अटक

बीडमध्ये कुंटणखान्यावर छापा, एकाला अटक

Published On: Jun 01 2018 2:07AM | Last Updated: May 31 2018 11:11PMबीड : प्रतिनिधी

येथील जयदुर्गा कॉलनीत छापा टाकून पोलिसांनी रामा वासुदेव लकडे (23 रा.धनगरवाडी ता.बीड) याला बुधवारी(दि.30)रात्री ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. त्याच्या ताब्यातून एका महिलेची सुटकाही केली आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली. 

एएचटीयू कक्षाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक भारत माने यांना जयदुर्गा कॉलनीत रामा लकडे हा वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहिती मिळाली.  त्यांनी हा प्रकार अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या कानी घातला. त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांना बोलावून घेत सापळा लावण्यास सांगितले. त्याप्रमाणे लाकाळ, माने यांच्यासह पोउपनि दीपाली गित्ते, ए. एम. सान, सिंधू उगले, निलावती खटाणे, मीना घोडके, सतीश बहिरवाळ, शेख शमीम पाशा, विकास नेवडे यांनी सापळा लावला. डमी ग्राहक पाठवून खात्री केली. इशारा मिळताच त्यांनी छापा मारला. 

यामध्ये त्यांनी लकडे याला रंगेहाथ पकडले तर बीडमधीलच एका 21 वर्षीय महिलेची सुटका केली. लकडे विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

उच्चभ्रू वस्तीत सुरू होता व्यवसाय

रामा लकडे हा या व्यवसायात मागील अनेक वर्षांपासून आहे. जयदुर्गा कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये त्याने किरायाणे खोली केली. याच खोलीत तो हा कुंटणखाना चालवित होता. उच्चभ्रू लोकांच्या वस्तीत असा प्रकार सुरू असूनही कोणालाच याची खबरबात नव्हती, हे विशेष. या कारवाईने खळबळ उडाली आहे.