Wed, Apr 01, 2020 00:10होमपेज › Marathwada › परभणी : शॉर्टसर्किटने फ्लॅटला आग, लाखोंचे नुकसान

परभणी : शॉर्टसर्किटने फ्लॅटला आग, लाखोंचे नुकसान

Last Updated: Jan 22 2020 5:28PM
मानवत (जि. परभणी) : प्रतिनिधी

शहरातील मध्य वस्तीतील डॉ. तोष्णीवाल यांच्या कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटमध्ये शॉर्टसर्किटने आज (दि. २२) आग लागली. या आगीत फ्लॅटमधील तब्बल एक लाखाचे नुकसान झाले. दुर्घटना पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. पालिकेच्या अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. 

अधिक वाचा : पाथरीच जन्मस्थळ, समिती नेमावी

याबाबत माहिती अशी की, शहरातील भाजीमंडई परिसरात डॉ. विजयकुमार तोष्णीवाल यांच्या संकुलात परमेश्वर उदावंत यांचा फ्लॅट आहे. येथे प्रकाश जिव्हेंकर व त्यांचे कुटुंबिय भाड्याने राहतात. आज, बुधवारी पहाटे पाणी गरम करण्यासाठी हिटर लावला होता. हा हिटर बादलीतील पाण्यात सोडला होता. मात्र, अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्याने हिटरच्या शेजारी असलेल्या फ्रीजने पेट घेतला. आग लागल्याची घटना समजताच जिव्हेंकर पती-पत्नी दोघेही भीतीने घराबाहेर पडले. आगीची माहिती त्यांनी शेजा-यांना सांगितली. 

अधिक वाचा : नांदेड जि.प.वर ‘महिला राज’

या घटनेनंतर तात्काळ मानवत नगरपालिका अग्निशमनदलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत आग पसरल्याने घरातील साहित्य जळाले. अग्निशमन दलाचे राम दहे, मुकेश कुमावत, सागर बागडे, चालक सय्यद कलिम यांनी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. सर्वप्रथम घरातील गॅस सिलेंडर घरातून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. 

अधिक वाचा : अ‍ॅपे उलटून महिला जागीच ठार