Tue, Jul 07, 2020 18:20होमपेज › Marathwada › उस्मानाबाद : नगराध्यक्ष रात्रभर ठाण मांडून, पाणीपुरवठा सुरळीत

उस्मानाबाद : नगराध्यक्ष रात्रभर ठाण मांडून, पाणीपुरवठा सुरळीत

Last Updated: Mar 30 2020 3:28PM

उस्मानाबाद : नगराध्यक्ष रात्रभर ठाण मांडून, पाणीपुरवठा सुरळीतउस्मानाबाद :  पुढारी वृत्तसेवा

कोरोनाची दहशत सर्व नागरिकांत असल्याने एका बाजूला अस्वस्थता असताना पालिकेने मात्र या काळात पाणी पुरवठ्याबाबत नागरिकांना कोणताच त्रास होणार नाही याची काटेकोर दक्षता घेतली आहे. रविवारी पहाटे फुटलेल्या मुख्य पाईपलाईन दुरुस्तीसाठी स्वत: नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर रात्रभर घटनास्थळावर थांबून होते. दुरुस्तीसाठीचा जेसीबी, साहित्य व मनुष्यबळ सोबत घेऊनच ते कुर्डूवाडीजवळील (जि. सोलापूर) कासारवाडी येथे धावले. यावरुन अशा अडचणीच्या काळात पाणीपुरवठ्याबाबत पालिका गंभीर झाल्याचे अधोरेखित झाले आहे.

►कोरोनाग्रस्त इस्लामपूरमुळे ऊसतोड मजुरांची फरफट

शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा होतो. हे अंतर साधारण 114 किलोमीटरचे आहे. त्यात समुद्र सपाटीचा विचार करता उजनी धरणापासून उस्मानाबाद 1000 फुट उंचीवर आहे. त्यामुळे पाईलाईन गळतीचा धोका अगदी चाचणीपासून ते आजतागायत सुरु आहे. मुख्य पाईपलाईनला लागलेली गळती मोठी व किचकट असेल तर साहजिकच अनेकदा आठ दिवसही लागलेले आहेत. 

►बीड जिल्ह्याच्या सीमा पूर्णत: लॉकडाऊन, आता कोणालाही प्रवेश नाही

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मात्र संपूर्ण शहर हवालदिल असताना पालिकेने पाण्याबाबत अधिक सावध भूमिका घेतली आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावे लागू नये त्यासाठी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकरांनी हा पुढाकार घेतला आहे.

►बीड : लॉकडाऊनमध्ये व्यसनांना लॉक करण्याची संधी 

24 तासांत दुरुस्ती

दरम्यान, रविवारी पहाटे कुर्डूवाडीजवळ या मुख्य पाईपलाईनला गळती लागल्याचे समजल्यानंतर नगराध्यक्षांनी हीच धडाडी दाखवली. पाईपलाईन तशीच सुरु ठेवली. सायंकाळी सर्व आवश्यक साहित्य व मनुष्यबळ जमा झाल्यानंतर उजनीतून उपसा बंद केला. साधारण रात्री सातला दुरुस्तीचे काम सुरु झाले. पहाटे चारला पूर्ण झाले. तोपर्यंत नगराध्यक्ष थांबून होते. उजनीहून उपसा सुरु केला. नगराध्यक्ष परतले. सामेवारी सकाळी आठला पुन्हा तिथेच गळती लागली. त्यामुळे हे काम पुन्हा तातडीने दुरुस्त केले. 

पाणीपुरवठा विस्कळीत होणार नाही. आवश्यक त्या यंत्रणांना सतर्क ठेवले आहे. सोमवारी दुपारीच उजनीचा उपसा सुरु केला आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याकडे पालिकेचा कटाक्ष आहे.
- मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष, उस्मानाबाद.