होमपेज › Marathwada › उस्मानाबाद : बाळाच्या पहिल्या वाढदिनाची रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

उस्मानाबाद : बाळाच्या पहिल्या वाढदिनाची रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

Last Updated: Apr 10 2020 10:55AM
उमरगा (उस्मानाबाद): पुढारी वृत्तसेवा 

तालुक्यातील समुद्राळ येथील रहिवाशी विक्रम यांच्या मुलाचा वाढदिवस मंगळवारी दि.७ रोजी होता. मात्र, त्या वाढदिवसात होणारा खर्च टाळून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुलाच्या पालकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अडीच हजार रुपयांची मदत केली आहे. 

याबाबतचे वृत्त असे की, तालुक्यातील समुद्राळ येथील विक्रम दिपंकर यांनी त्यांच्या मुलाचा (कबीर) चा पहिला वाढदिवस थाटामाटात साजरा करण्याचा निश्चय केला होता. मात्र, संपूर्ण जग कोरोनाने त्रस्त आहे. देशात लॉकडाऊन आहे. दिवसागणिक अनेक रुग्णांची संख्या वाढतच आहे. अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टर्स, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडीत आहेत. याप्रसंगी मुख्यमंत्री व प्रशासनातील यंत्रणा खूप प्रभावीपणे काम करत आहे. म्हणून मुख्यमंत्र्यानी जनतेला मदतीचे आवाहन केल्यानुसार आपल्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मदतीसाठी पालकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अडीच हजार र. ची रक्कम दिली आहे.

आज समाजासमोर कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. या आजाराने सर्वच स्तरातील माणसांना धडकी भरली आहे. सरकार, प्रशासन मोठ्या धैर्याने याचा मुकाबला करीत असताना प्रत्येक माणसाने सरकारच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, या भावनेने आणि लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये म्हणून बाळाचा वाढदिवस घरातच साजरा करून निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे.
              -  विक्रम दिपंकर - पालक, समुद्राळ. ता. उमरगा, उस्मानाबाद