Sat, Dec 07, 2019 09:04



होमपेज › Marathwada › परळीत पाणी टंचाईचा बळी; पाणी भरण्याच्या धडपडीत एकाचा मृत्यू!

परळीत पाणी टंचाईचा बळी; पाणी भरण्याच्या धडपडीत एकाचा मृत्यू!

Published On: May 10 2019 10:20AM | Last Updated: May 10 2019 10:09AM




परळी वैजनाथ : प्रतिनिधी 

पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून, पाणी भरण्याच्या धडपडीत लोकांना जीव गमवावा लागत आहे. आज (ता.10) सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास संजय राजाभाऊ विडेकर (वय 48) रा. हालगे गल्ली परळी वैजनाथ यांचा हौदात उतरून पाणी भरताना मोटारीचा शॉक बसून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. 

याविषयी अधिक माहिती अशी की, नगर परिषदेकडून परळीत दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्‍यामुळे पाण्याची साठवणूक करण्यासाठी नागरिकांकडून धडपड करण्यात येत आहे. यातूनच हौदात मोटार लावून पाणी भरताना वीजेचा धक्‍का बसून संजय विडेकर यांना प्राण गमावावा लागला.

विशेष म्हणजे परळीच्या नगराध्यक्षांच्या प्रभागात घडलेली ही दुर्दैवी घटना आहे. विडेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. ते पानटपरी चालवून घराचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मृत्यूने कुटुंब उघड्‍यावर आले आहे. पाणी टंचाईच्या परिस्थितीने विडेकर यांचा बळी गेल्‍याने हालगे गल्ली भागातील नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.