Mon, Aug 03, 2020 14:59होमपेज › Marathwada › मॉर्निंग वॉकला गेलेल्‍या तरुणाचा बसच्या धडकेत मृत्‍यू 

मॉर्निंग वॉकला गेलेल्‍या तरुणाचा बसच्या धडकेत मृत्‍यू 

Published On: Feb 09 2019 5:43PM | Last Updated: Feb 09 2019 5:23PM
अहमदपूर  प्रतिनिधी 

पहाटेच्या वेळी रनिंग करताना दोन तरुणांना पाठीमागून आलेल्‍या बसने धडक दिल्याने एकाचा मृत्‍यू झाला. या अपघातात दुसरा तरुण जखमी झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील मोरेवाडी येथील ओमसाईल भाऊराव जाधव (वय१८) हा ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ५.३० वा. दिपक कानवटे, दिनेश मोरे, गणपत राकिले हे मिळून मोरेवाडी पाटीवर नांदेड बिदर राज्य मार्गावर रनिंग करत होते. यावेळी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बस ( क्र.एम.एच.२० डि.९५२७ ) ने ओमसाईल जाधव याला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात ओमसाईलला जास्त मार लागल्‍याने तो जखमी झाला. मात्र या घटनेनंतर बस चालक आंबादास गोविंद गुंजुटे याने बस न थांबवता तेथुन पळ काढला.

यावेळी सोबत असलेल्या दिपक कानवटे याने या अपघाताची माहिती जाधव याच्या घरच्यांना देवून अपघातग्रस्त ओमसाईला एका ॲटो चालकाच्या मदतीने अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी त्‍याला मृत घोषीत केले. अनंत जाधव यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिसांनी बस क्र. एम एच २० डि ९५२७ च्या चालक आंबादास गोविंद गुंजुटे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस उप निरीक्षक गिते हे करत आहेत.