Sun, Dec 08, 2019 09:02होमपेज › Marathwada › माहूर : दत्तशिखर घाटात भाविकांच्या ऑटोला अपघात

माहूर : दत्तशिखर घाटात भाविकांच्या ऑटोला अपघात

Last Updated: Oct 09 2019 4:04PM

संग्रहित छायाचित्रमाहूर (नांदेड) : प्रतिनिधी  

किनवट तालुक्यातील दूधगांव आणि पेंदा येथील भाविक ऑटोने माहूरगडला देवी-देवतांच्या दर्शनासाठी गेले होते. गावाकडे परत जाण्यासाठी निघाले असता श्री दत्तशिखर संस्थानच्या जवळच्या घाटातील दुसऱ्या वळणावर ब्रेक निकामी झाल्याने ऑटो पलटी झालाी त्यात 11 भाविक जखमी झाले. त्यापैकी 5 जखमीची गंभीर परिस्थीती आहे. सर्व जखमींना माहूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले आहे. गंभीर जखमींना यवतमाळला रवाना करण्यात आहे. 

दस-याच्या शुभ मुहूर्तावर (ता. 8) ला श्री रेणुकामाता व श्री दत्त प्रभूचे दर्शन घेवून गावाकडे परत निघालेल्या भाविकांचा अपघात झाला. दरम्यान (एमएच-26-एके 2037) या क्रमांकाचा ऑटो पलटी झाली. ओम तोंडे (वय 10), नागराज तोंडे, (13), कृष्णा तोंडे (13), मीरा तोंडे(35) यांना गंभीर दुखापत झाली. तर विठाबाई केंद्रे (70), मीना होलंबे (35), वैभव होलंबे (12), हे किरकोळ जखमी झाले आहेत. तिघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. चालक सूर्यकांत गायकवाड यास मुक्का मार लागला असून त्याचेवर माहूर येथेच उपचार चालू आहेत.